लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेवर पाठवले. त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे सर्वत्र सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहे. परंतु पुण्यामध्ये असलेल्या कात्रज चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे लावलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे. “हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”, असे वाक्य लिहून सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यामुळे रिपाइंने कोणावर निशाणा साधला आहे, त्यावर राजकीय चर्चा सुरु झाली आहे. (Sunetra Pawar)
काय आहे बॅनर्सवर
कात्रज चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे लावलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे. रिपाइंच्या सचिन खरात गटातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बॅनर लावले आहे. त्यावर “हारकर जितने वाले को बाजीगर कहते है” असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या बॅनर्सवर सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सचिन खरात आणि राजाभाऊ कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो आहे. (Sunetra Pawar)
बारामतीमध्ये ‘केंद्रीय मंत्री’ म्हणून बॅनर
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचे (Sunetra Pawar) ‘भावी केंद्रीय मंत्री’ म्हणून बॅनर लागले. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. श्रीकांत जाधव मित्र परिवाराच्या वतीने बारामती शहरात भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावले आहे. (Sunetra Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community