Sunetra Pawar: ठरलं तर! राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

217
Sunetra Pawar: ठरलं तर! राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
Sunetra Pawar: ठरलं तर! राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2024) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात (NCP) गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू होती. अशातच आता राज्यभेसाठी (Rajya Sabha) अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अजितदादा गटातील वरिष्ठ नेत्यांची बुधवारी (१२ जून) रात्री उशिरा देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Sunetra Pawar)

सुनेत्रा परावांच्या नावावर शिक्कामोर्तब

आज (१३ जून) दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. अशातच आता सुनेत्रा परावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून आजच त्या (Sunetra Pawar) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Sunetra Pawar)

राज्यसभेच्या रिक्त जागेवर अजितदादा कुणाला पाठवणार?

प्रफुल्ल पटेलांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर अजितदादा कुणाला पाठवणार? हा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. राज्यसभेसाठी अजित पवार घरातला चेहरा देणार की, पक्षातील ज्येष्ठ नेत्याची त्यावर वर्णी लागणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर हा सस्पेन्स संपल्याचं दिसतंय. राज्यसभेसाठी अजितदादांकडून सुनेत्रा पवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. (Sunetra Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.