Sunetra Pawar यांची राज्यसभेत बिनविरोध निवड 

277
Sunetra Pawar यांची राज्यसभेत बिनविरोध निवड 

लोकसभा २०२४ (Lok sabha Election 2024) च्या निवडणुकीत बारामतीमध्ये (Baramati Election Drama) हायव्होल्टेज सामना रंगला होता. मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना कुटुंबातूनच आव्हान देण्यात आलं होतं. सुळे यांच्या भावजय सुनेत्रा पवार हे महायुतीकडून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी गुरुवारी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.  (Sunetra Pawar)

(हेही वाचा – NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा नाही, Dharmendra Pradhan यांनी फेटाळले आरोप)

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार (Sunetraa Pawar) यांनी गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी ३ पर्यंत इतर कोणीही उमेदवारी अर्ज न केल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड (Rajya Sabha MPs elected unopposed) झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या, “पक्षाने मला राज्यसभेची अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते.” असे विधान सुनेत्रा पवार यांनी केले. 

(हेही वाचा – POCSO Case : B. S. Yediyurappa यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी)

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना यावेळी विचारण्यात आलं की तुमचा पक्ष केवळ अजित पवार यांच्या कुटुंबापुरता सीमित झाला आहे अशी टीका होत आहे, त्याबाबत काय सांगाल? त्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी मिळून घेतला आहे. गुरुवारी माझा उमेदवारी अर्ज भरताना स्वतः छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील इतर नेतेही उपस्थित होते. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मी ठामपणे सांगेन की पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही.” असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.