Sunetra Pawar: बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची ‘ती’ पोस्ट!

342
Sunetra Pawar: बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची 'ती' पोस्ट!
Sunetra Pawar: बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची 'ती' पोस्ट!

बारामती हा मतदारसंघ महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज (Sunetra Pawar) मतदारसंघ होता. या ठिकाणी नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. भाजपासह महायुतीने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बारामतीतून तिकिट दिलं होतं. तर महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) तिकिट दिलं होतं. सुप्रिया सुळे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. (Sunetra Pawar)

(हेही वाचा –जागतिक आंतरराष्ट्रीय T20 क्रीडा स्पर्धांचे दूरदर्शनवर होणार प्रसारण, ‘या’ विशेष क्रीडागीताचे केले आयोजन)

बारामतीतल्या (Baramati) विजयानंतर सुप्रिया सुळेंनी आणि अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उत्सुकता होती ती सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निकालाबाबत काही भाष्य करतात का याची? ते भाष्य त्यांनी केलं आहे. सुनेत्रा पवार यांनी एक पोस्ट करत बारामतीतल्या निकालावर भाष्य केलं आहे.(Sunetra Pawar)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या रणांगणात भाजपाचे तीन मुख्यमंत्री; काय आहे जनतेचा कौल ?)

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ट्विटर पोस्ट करत म्हणाल्या, “लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election Result) मध्ये जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारते. हाती आलेले निकाल अनपेक्षित असले तरीही या निकालातून आम्ही आत्मपरीक्षण करु. नव्याने पुनर्बांधणी करु. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला मतदान केलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसंच सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. सर्व कार्यकर्ते व जनता यांच्या सहकार्याबद्दलही धन्यवाद देते. जनसेवेचा माझा प्रवास इथेच संपत नाही. मी जनसेवेस कायमच तत्पर आहे आणि असेन. पुनश्च आभार!” असं म्हणत सुनेत्रा अजित पवार यांनी पोस्ट केली आहे आणि बारामतीच्या निकालावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.(Sunetra Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.