Pawar Vs Pawar : बारामतीत सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया

राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या बारामतीतून निवडणूक रिंगणात उतरुन राजकारणाचा श्रीगणेशा करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

396
Pawar Vs Pawar : बारामतीत सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया
Pawar Vs Pawar : बारामतीत सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया
  • सुजित महामुलकर

राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा (Sunetra Pawar) या बारामतीतून निवडणूक रिंगणात उतरुन राजकारणाचा श्रीगणेशा करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधित्व शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya sule) करत आहेत. मैदानात जरी सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया दिसत असले तरी खरी लढत काका विरुद्ध पुतणे अशीच ओळखली जाणार. (Pawar Vs Pawar)

उमेदवार म्हणून ओळख

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैचारिक मंथन शिबीर कर्जत येथे पार पडले. या शिबिराला सुनेत्रा यांनीही हजेरी लावली होती. एका जेवणावळीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि ज्येष्ठ नेते एकत्र जेवत असताना अजित पवार यांनी सुनेत्रा यांना बोलावले आणि त्यांची ‘या लोकसभेसाठी बारामती मतदार संघाच्या आमच्या उमेदवार’ अशी नव्याने ओळख करून दिली असल्याची माहिती त्याठिकाणी उपस्थित असलेल्या सूत्रांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ ला दिली. (Pawar Vs Pawar)

(हेही वाचा – Asian Shooting Qualifiers : भारताच्या नॅन्सी आणि इलावेनिल यांना एअर रायफल प्रकारात सुवर्ण व रौप्य )

चार मतदार संघ जाहीर

कर्जत येथे आपल्या समर्थकांच्या सभेला संबोधित करताना पवार यांनी आपला पक्ष बारामती (Baramati), शिरूर (Shirur), सातारा (Satara) आणि रायगड (Raigad) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर सांगितले होते. सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी ते त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना बारामतीत पक्षाचे उमेदवार म्हणून उभे करू शकतात, असे संकेत त्यांनी यापूर्वीही दिले आहेत. (Pawar Vs Pawar)

कोणते पवार महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पॉवरफुल’?

बारामतीच्या विद्यमान खासदार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अशी लढत होण्याची शक्यता वाढली असून बारामती कोण जिंकणार? यावर कोणते पवार महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पॉवरफुल’ आहेत याच्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब होईल. (Pawar Vs Pawar)

(हेही वाचा – BCCI Annual Awards 2023 : कोव्हिडनंतर पहिल्यांदा रंगणार बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा)

सुनेत्रांसाठी निवडणूक जिंकणे सोपे नाही

सुप्रिया सुळेंप्रमाणे सुनेत्रा यांना राजकीय अनुभव नाही. मात्र बारामतीत अजितदादांना भक्कम जनाधार असल्याने त्यांना फार मोठी अडचण ठरणार नाही. असे असले तरी सुनेत्रा यांच्यासाठी निवडणूक जिंकणे सोपे असणार नाही याचे कारण शरद पवार यांना मानणारा वर्ग आजही मोठा आहे. या वर्गाला अजित पवार आपल्याकडे कसे वळवून घेतात यावर त्यांची आपल्या बालेकिल्ल्यातील ताकद दिसून येईल. एकूणच ही लढत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची असणार यात शंका नाही. (Pawar Vs Pawar)

सुप्रिया २००९ पासून तीन वेळा विजयी

२००९ पासून सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असून येणारी निवडणूक ही त्यांची चौथी असेल. २००९, २०१४, २०१९ मध्ये त्यांनी विजयी पताका कायम राखत निवडणूक जिंकली. गेल्या निवडणुकीत तत्कालीन आमदार राहुल कूल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने (BJP) सुप्रिया यांच्यासमोर उभे केले, मात्र सुळे यांनी दीड लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला. (Pawar Vs Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.