अयोध्येतील बाबरी मशीद हटवून राम मंदिर (Ram temple) उभारल्यानंतर आता पुण्यात दर्गा हटवून पुण्येश्वर मंदिराची उभारणी करण्याचा निर्धार भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी केला. (Punyeshwar Temple)
पुण्येश्वर मंदिर मिळालं पाहिजे
पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “सर्व भारतीयांना राममंदिर मिळालं. आता पुणेकरांना पुण्येश्वर मंदिर मिळालं पाहिजे! “प्रश्न फक्त एका मंदिराचा नाही तर कट्टरपंथी मानसिकतेचा आहे. इथे आम्हाला जे हवं ते करू! तुमच्या पुरातन मंदिरावर दर्गा बांधू! तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही! ही मुजोरी आहे. तिला वेसण घालणे गरजेचे आहे.” (Punyeshwar Temple)
(हेही वाचा – CRIME: लैंगिक अत्याचार करणाऱ्या नौशाद शेखच्या अनधिकृत बांधकामावर फिरला बुलडोझर)
हा पुणेकरांचा अधिकार
ते पुढे म्हणाले, “जागो-जागी अनधिकृत प्रार्थनास्थळे उभी होतात. मग तेथे अनेक देशविघातक षडयंत्रे सुरू होतात. बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्या इत्यादींचा सुळसुळाट होतो. लव-जिहादसारख्या घटना वाढत जातात. यांना वेळीच आळा नाही घातला, तर काही वर्षात सर्व पुण्यात कोंढव्या समस्थिती निर्माण होईल. पुण्येश्वराची पुर्नप्राप्ती प्रतिकात्मक आहे. हे मंदिर परत मिळणं हा पुणेकरांचा अधिकार आहे. पुणे सुरक्षित झाल्याशिवाय विकसित आणि समृद्ध होऊ शकत नाही!” (Punyeshwar Temple)
त्यांनी आपल्या भाषणाचा काही भाग ‘X’ या समाजमाध्यमावर पोस्ट केले असून त्याला नेटकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत पाठींबा दर्शवला. (Punyeshwar Temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community