Sunil kedar: सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता

नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने कॉंग्रेस आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

176
Sunil kedar: सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता
Sunil kedar: सुनील केदार मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर, रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता

कॉंग्रेसच आमदार सुनील केदार यांना मायग्रेनमुळे ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने कॉंग्रेस आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

शिक्षा सुनावल्यानंतर गुरुवारी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या इसीजीमध्ये बदल दिसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील केदार यांचा शनिवारी सीटी स्कॅन, एमआरआयएम काढला. त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मायग्रेनमुळे सुनिल केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. मायग्रेनमुळे त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.

(हेही पहा –  Drone attack : हिंदी महासागरात कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या जहाजावर ड्रोन हल्ला, आयसीजीएस विक्रमचे प्रक्षेपण, नौदल सतर्क)

अतिदक्षता विभागाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी केदार यांचा ईसीजी, इको, रक्तासह मेंदूशी संबंधित बऱ्याच चाचण्या झाल्या. त्यांचे सीटी स्कॅन आणि एमआरआय तापासणीही झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मायग्रेनच्या उपचाराकरिता त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. ते दाखल असलेल्या अतिदक्षता विभागाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.