विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जोरदार धक्का बसला आहे. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी उबाठा गटाला रामराम ठोकला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंची भेट होत नसल्याने आम्ही प्रश्न कुणीकडे मांडायचे? असे म्हणत पक्षप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर त्यांनी सवाल उपस्थित केला.
(हेही वाचा : Commonwealth Games 2026 : राष्ट्रकूल खेळांतून हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, नेमबाजी या खेळांची गच्छंती)
महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) म्हणाले, शिवसेनेतील बंडानंतर मी उद्धव ठाकरेंची साथ दिली. बंजारा समाजाचे हित लक्षात घेता मी दि. ३० सप्टेंबर २०२२ ला उबाठा गटात प्रवेश केला होता. त्यानंतर दि. ९ जुलैला उद्धव ठाकरे पोहरादेवीला दर्शनाकरिता आले. त्यावेळी बंजारा समाजाचे प्रश्नांवर लक्ष देऊन आम्हाला न्याय देण्याचे आश्वसन त्यांनी आम्हाला दिला. मात्र त्यांनतर गेल्या १० महिन्यांपासून बंजारा समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही, अशी खंतही महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी व्यक्त केली.
दरम्यान उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मेसेज करून, फोन करून बंजारा समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असल्याची ही महाराजांनी (Sunil Maharaj) सांगितले. त्यामुळेच त्यांनी उबाठा गटातील पदाचा राजीनामा दिला आहे. याआधीही पक्षातील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना वेळ देत नसल्याची टीका उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) झाली आहे. शिवसेनेतील बंडामागे ही अशीच एक भुमिका संजय शिरसाट यांनी मांडली होती. त्यात महाराजांनी विदर्भात आणि मराठवाड्यात प्रत्येकी तीन उमेदवार उबाठा गटाने बंजारा समाजातील द्यावे, अशी मागणी ही महाराजांनी केली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community