राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगासमोर गुरुवारी (०९ नोव्हेंवर) होणाऱ्या सुनावणीला आलेले खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. राऊत यांनी त्यांच्या पक्षाबाबत काय बोलायचे ते बोलावे. परंतू अजित पवार यांच्याबाबत उलटसुलट बोलू नये, असे ते म्हणाले. (Sunil Tatkare)
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सुनील तटकरे म्हणाले की, महाराष्ट्रत ओबीसीला आरक्षण मिळायला पाहिजे आणि ते कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मिळायला पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे. महाविकास आघाडी सरकारने हा मुद्दा गांभीर्याने हाताळला असता तर सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले असते. एवढंच नव्हे तर, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. संपुआच्या काळात जनगणना झाली होती. मात्र काँग्रेस सरकारने ती जाहीर का नाही केली? असा उलट प्रश्न त्यांनी केला. (Sunil Tatkare)
(हेही वाचा – National Games 2023 : गोव्यातील राष्ट्रीय खेळांत खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा सुवर्णाचा डबल-बार)
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झालेला आजार हा राजकीय आजार आहे, असा खोचक टोमणा राऊत यांनी लावला होता. याबाबत विचारले असता तटकरे यांनी राऊत यांना एकप्रकारे सावधगिरीचा इशारा दिला. राऊत यांनी त्यांच्या पक्षाबाबत काय बोलायचे ते बोलावे. परंतू अजित पवार यांच्याबाबत उलटसुलट बोललेलं अजिबात खपवून घेतले जाणार नाही. (Sunil Tatkare)
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना पसरला होता. तेव्हा ठाकरे आजारी असल्याचे सांगून घरात दडून बसले होते. मग, उद्धव ठाकरे यांचा आजार सुद्धा राजकीय आजार होता काय? असा प्रश्न सुद्धा तटकरे यांनी विचारला. राऊत हे विचार न करता बोलणारे व्यक्ती आहेत. शिवसेनेचे सर्वाधिक नुकसान कुणी केले असेल तर ते संजय राऊत यांनी केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले. तर, खासदार सुप्रिया सुळे यांना नैराश्य आले आहे. यामुळे त्या ‘ती” व्यक्ती “ते” गृहस्थ असा उल्लेख करीत आहेत, असा टोला तटकरे यांनी लावला. तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचाही समाचार घेतला. (Sunil Tatkare)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community