नरेंद्र मोदींच्या भेटीबद्दल सांगताना Sunil Tatkare भावुक; म्हणाले… 

235
स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीचा 'संविधान वाचन' उपक्रम; Sunil Tatkare यांची माहिती

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीत कोकणातील रायगड जिल्ह्यातील खासदार आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या भेटीच्या आठवणी उलगडून सांगितल्या. त्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि मी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी माझा हात धरला तो पाच मिनिटे सोडलाच नाही, इतकेच नव्हे तर माझ्या विजयाचं कौतुक केलं असं विधान सुनील तटकरे यांनी केले. (Sunil Tatkare)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पहिल्याच भेटीची आठवण सांगताना सुनील तटकरे म्हणतात की, भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपकी बेटी कैसी है’ अशी चौकशी केली. त्यानंतर चहा पान कार्यक्रमावेळी ‘सुनिल काहीतरी खाऊन घे’ असं मला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सांगितलं. हा सगळा मोठा आनंदाचा क्षण सांगत असताना यावेळी मला मंत्रिपदापेक्षा आणखी काय हवं अशी भावनिक आठवण खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात आयोजित रोहा येथे बोलताना सांगितले. (Sunil Tatkare)

(हेही वाचा – जून अखेरपर्यंत ७५ टक्के पीक कर्ज वाटपाचे कृषी मंत्री Dhananjay Munde यांनी दिले निर्देश)

पुढे, सुनील तटकरे म्हणाले की, ‘बहुत अच्छा हो गया आप चुनाव जीतके आये’ हे पहिलं वाक्य परत १/२ एक मिनिट शांततेत गेलं. पुढचं वाक्य होतं ‘ बेटी कैसी है’ म्हणजे आदिती कशी आहे? हे देशाच्या पंतप्रधानांना माझी मुलगी काम करते हे माहिती असणं आणि त्यांनी हे उच्चारणं हा सगळा किस्सा सांगताना खासदार सुनील तटकरे काहीसे भावूक झाले. माणसं मोठी का असतात. इतकी मोठी माणसे जगाच्या पाठीवरती शक्तिशाली नेता म्हणून ज्यांची ओळख आहे. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उदय सामंत, नारायण राणे असतील आम्ही सगळे पुन्हा कोकणी जनतेकडे जाऊन विधानसभेला हा स्पष्ट कौल घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मला तुम्हाला भेटण्यासाठी यायला दहा दिवस उशीर झाला. शरीराने मी तिकडे होतो. अगदी पंतप्रधान (PM Modi) महोदयांनाही भेटलो पण माझं मन मात्र या मतदारसंघांमध्ये होतं. ज्या मतदारसंघाने मला ८० हजारच्या लीडने निवडून आणलं, अशा शब्दात त्यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांचंही खासदार सुनील तटकरे यांनी कौतुक केलं. (Sunil Tatkare)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.