‘खरी राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) कुणाची’ यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission of India) सुनावणी सुरू आहे. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले. शरद पवार (Sharad Pawar) गटाने ‘अजित पवारांचा (Ajit Pawar) पक्षविस्तारात कुठलाही हातभार नाही’, असा युक्तीवाद करून अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गटाच्या आरोपांना अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिले आहे.
(हेही वाचा – NCP Hearing : पक्षविस्तारात अजितदादांचा हातभार नाही; शरद पवार गटाचे सुनावणीत आरोप)
आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार
“आम्ही निर्णय घेत असतांना सर्वोच्च न्यायालायने घेतलेले निर्णय, निवडणूक आयोगाने विविध पक्षांबाबत वेळोवेळी घेतलेले निर्णय या सगळ्याचा कायदेशीर, वैधानिक अभ्यास करून घेतला असल्याने आम्हाला विश्वास आहे की, आमच्या निर्णयावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होईल”, असा विश्वास सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. (Sunil Tatkare On NCP Hearing)
शरद पवार गटाकडून वेळकाढूपणा
“निवडणूक आयोगासमोरील शरद पवार गटातील युक्तीवाद आज संपण्याची अपेक्षा होती. युक्तीवाद पूर्ण न झाल्यास लेखी उत्तर मांडतील. युक्तीवाद पूर्ण झालेला नाही. शरद पवार गटाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. पुढच्या आठ दिवसांनंतरची तारीख वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला जातो, हे एकंदरित अनाकलनीय आहे”, असे स्पष्टीकरण अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी दिले. अजित पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी युक्तीवाद करणार आहेत.
(हेही वाचा – Mumbai AirPort : विमानतळ उडविण्याची धमकी देणाऱ्याला केरळ मधून अटक)
आमच्याकडे कायदेशीर उत्तरे आहेत
अजित पवारांची अध्यक्षपदाची नेमणूक बेकायदा असल्याचा युक्तीवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला. त्यावर उत्तर देतांना सुनील तटकरे म्हणाले की, युक्तीवाद करत असतांना काही भूमिका मांडावी लागते. याचे सविस्तर कायदेशीर उत्तर आमच्याकडे आहे. ज्या वेळी आमच्या बाजूने युक्तीवाद सुरू होईल, तेव्हा हे आरोप खोडून काढले जातील. सर्व प्रश्नांची उत्तरे आमचा युक्तीवाद सुरू होईल, त्या क्रोनोलॉजीनुसार दिली जातील. (Sunil Tatkare On NCP Hearing)
शरद पवार गटाचे आरोप
”बोगस प्रतिज्ञापत्र (bogus affidavit) दाखल करणे हा फौजदारी गुन्हा आहे. आयोगाने याची दखल घेत यावर कायदेशीर कारवाई करावी. या मुद्द्यावर आयोगाने आधी सुनावणी घ्यावी, अशी मागणी शरद पवार गटाने सातत्याने केली. हा वाद अध्यक्षपदाचा नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे”, असा युक्तीवाद शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगासमोर केला आहे. (NCP Hearing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community