शरद पवार २०१७मध्ये भाजपासोबत सरकार स्थापन करणार होते; पण…; Sunil Tatkare यांनी अनेक गुपिते फोडली

काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उद्धव ठाकरेही तेव्हा उपस्थित होते. आम्हीही होतो. काँग्रेस नेत्यांच्या या विधानांमुळे आमच्या मनाला वेदना झाल्या. त्याची परिणती अजितदादांच्या शपथविधीमध्ये झाली, असे तटकरे म्हणाले.

171

शरद पवारांनी 2017 मध्येच भाजपासोबत जाण्याची तयारी केली होती. त्यानुसार आम्ही दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर शहांनी शिवसेनाही आपल्यासोबत कायम राहील, असे स्पष्ट केले. हे आम्हाला मान्य नव्हते. राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर भाजपा शिवसेनेला दूर करेल असा आम्हाला वाटत होते. पण त्यांनी तसे केले नाही. आम्ही महिनाभर वाट पाहिली, परंतु भाजपाने शिवसेनेला दूर केलेच नाही, त्यामुळे अखेर शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय रद्द केला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे काँग्रेस (अजित पवार) चे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला.

त्यावेळी अमित शहा यांनी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी व बाळासाहेब ठाकरे यांनी एनडीएची स्थापना केली होती. त्यामुळे आम्ही शिवसेनेला बाहेर जा असे सांगणार नाही. पण ते स्वतःहून गेले तर आम्ही हरकत घेणार नाही, असे म्हणाले होते. आम्हाला त्यांची भूमिका पसंत पडली नाही, असे तटकरे म्हणाले. तटकरे (Sunil Tatkare) हे एबीपी माझाला मुलाखत देताना बोलत होते.

(हेही वाचा उबाठाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकावले; Nitesh Rane यांचा आरोप)

…म्हणून २०१९मध्ये पहाटेचा शपथविधी झाला 

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या होत्या. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील एकत्रित शिवसेना व शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेव्हा चर्चेचे फड रंगत होते. पण अजित पवार यांनी एकेदिवशी अचानक भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला. 2019 मध्ये भाजपा शिवसेनेचे सरकार होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही हस्तक्षेप केला. त्यानंतर शिवसेना व दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली. त्यातून महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्यानंतर अचानक पहाटेचा शपथविधी झाला. त्यामागे काही कारणे होती, असे सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले. दिल्लीत ठरल्यानुसार मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये एक बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उद्धव ठाकरेही तेव्हा उपस्थित होते. आम्हीही होतो. काँग्रेस नेत्यांच्या या विधानांमुळे आमच्या मनाला वेदना झाल्या. त्याची परिणती अजितदादांच्या शपथविधीमध्ये झाली. पण ते सरकार टिकले नाही, असे सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.