न्यायालयात होणारा युक्तीवाद हा मराठीत नाही तर इंग्रजीत होतो. मात्र अश्रू ढाळणार्यांना तिथला युक्तीवाद हा मराठीत आहे की इंग्रजीत हे कळू शकले नाही असा टोला लगावतानाच त्यामुळेच लोकांमध्ये वेगळे चित्र निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. (Sunil Tatkare)
काल परवा काहींच्या डोळ्यात अश्रू आले. शरद पवार यांचा उल्लेख न्यायालयात एकेरी पध्दतीने झाला असे अश्रूला वाट करून देत मोकळेपणाने सांगण्याचा प्रयत्न काहींनी केला असाही टोला लगावतानाच या युक्तीवादाची माहिती घेतली त्यामध्ये जो उल्लेख एका ‘पॅरा’ मध्ये करण्यात आला आहे. त्याचा संदर्भही पूर्वीचा आहे तो संदर्भच वाचण्यात आला. कारण आधीच्या याचिकेतील जो निर्णय दिला गेला होता त्यातीलच ‘पॅरा’ वाचण्यात आला. अनेक वेळा पाहतो की इंग्रजीमध्ये उल्लेख करताना ‘he said so’, ‘he did so’ असे म्हणत असतो मराठीत आदरातिथ्य म्हणून ‘ते’ म्हणत असतो. तर एकेरी शब्दाचा उल्लेख कधी उच्चारला जातो. इंग्रजीत ‘he’ हा एकच शब्द आहे. त्यामुळे तिथे होणारा युक्तीवाद हा मराठीत नाही असा सणसणीत टोलाही तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड व जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला. (Sunil Tatkare)
(हेही वाचा – BMC Tree Plantation : मुंबईत पुन्हा बहरणार दुर्मिळ झाडे)
निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आमच्या वतीनेही युक्तीवाद सुरू आहे. मात्र, आमच्या याचिकेत जे मुद्दे उपस्थित केले होते त्यासंदर्भातील आमची भूमिका कायदेशीर कसोटीवर कशी योग्य आहे हे त्याठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे स्पष्टीकरणही तटकरे यांनी दिले. त्याचवेळी आजचा युक्तीवाद हा कायद्याच्या कसोटीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य कसा आहे ती बाजू मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे याकडेच होता हेही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. (Sunil Tatkare)
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी यांच्यावर अज्ञात व्यक्तीने जो भ्याड हल्ला केला त्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध तटकरे यांनी केला. राज्य सरकारनेही गृहविभागाची यंत्रणा कामाला लावून हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (Sunil Tatkare)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community