आमदार लांडेंवर कारवाई करा, अन्यथा…! ‘त्या’ कर्मचाऱ्याचा इशारा 

तो नाला ८ दिवसांपूर्वीच साफ करण्यात आला होता. त्यांची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना आहे. मात्र घटनेच्या दिवशी कुणीतरी त्या नाल्यात नव्याने गाळ आणून फेकला, असा आरोप कंत्राटदाराच्या पीडित सुपरव्हायझरने केला आहे.

मुंबई महापालिकेकडून कुर्ल्यातल्या कमानी भागात नालेसफाईचे काम दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरने नालेसफाई न केल्याने या भागात पाणी तुंबले, असा आरोप करत शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी थेट त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सुपरव्हायझरला फिनिक्स नाल्याकडे जमिनीवर बसवून त्याच्यावर नाल्यातील गाळ ओतला आणि मारहाण केली. घडल्या प्रकरणी आता त्या सुपरव्हायझरने आमदार लांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा, अन्यथा आत्महत्या करेन, त्याला सर्वस्वी आमदार लांडे कारणीभूत असतील, असा इशारा दिला आहे.

(हेही वाचा : शिवसेना आमदाराने कॉन्ट्रॅक्टरला झोडले… पण स्वतः कोरोनाचे नियम तोडले)

काय म्हटले आहे सुपरव्हायझर नरपत कुमारने पत्रात? 

  • आपण एम मोना एंटरप्रायझेसमध्ये कंत्राटी सुपरव्हायझर आहे. १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी आपणास सुंदरबाग येथील फिनिक्स नाला येथे जबरदस्तीने जमिनीवर घाणीत ढकलून दिले. त्यानंतर माझ्या सर्व अंगावर नाल्यातील गाळ ओतण्यात आला. पुढे मारहाण करून धमकावण्यात आले.
  • हा नाला ८ दिवसांपूर्वीच साफ करण्यात आला होता. त्यांची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना आहे. मात्र घटनेच्या दिवशी कुणीतरी त्या नाल्यात नव्याने गाळ आणून फेकला आणि नाला साफ केला नसल्याचा आरडाओरडा केला. आपल्याला मारहाण झाली, आपल्यावर घाण ओतण्यात आली.
  • आमदार लांडे यांनी मला मारण्यासाठी लोकांना उचकवले. या घटनेने आपणास प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास झाला आहे. या प्रकरणी जर आमदार लांडे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली नाही तर आपण आत्महत्या करणार असून त्याला आमदार लांडे जबाबदार असतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here