नितेश राणेंच्या अडचणीत वाढ! जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचाही नकार

102

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे.सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.  नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने १० दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही. मात्र शरण झाल्यानंतर नितेश राणे नियमित जामिनसाठी अर्ज करु शकतात.

नितेश राणेंची सर्वोच्च न्यायालयात धाव पण…

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिन्यात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये नितेश राणे यांना आरोपी करण्यात आले आहे. राणेंना १० दिवस अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले आहे आणि गेल्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयासमोर शरण येण्यासाठी मुदत दिली आहे.

(हेही वाचा – बूस्टर डोस प्रभावी आहे की नाही? तज्ज्ञांच्या मनात शंका!)

यापूर्वी नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळाला नव्हता, त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. नितेश राणे यांना यापूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांना खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्याचवेळी या प्रकरणातील आणखी एक सहआरोपी मनीष दळवी याच्या अटकपूर्व जामिनाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली.

असा आहे नितेश राणेंवर आरोप

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंवर केला होता. त्यानंतर कणकवली पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलम-३०७ (हत्येचा प्रयत्न), १२० (ब) (गुन्हेगारी कट) आणि ३४ (सामान्य हेतू) अन्वये गुन्हा दाखल केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.