माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेंबरपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिला आहे. हा राज्य सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. जर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येणार असेल, तर पुढच्या ४८ तासांत सिंग हजर राहतील, असेही सिंग यांचे वकील पुनीत बाली यांनी न्यायालयाला सांगितले. कारण परमबीर सिंग हे भारतात आहेत, ते कुठे परदेशात पळून गेलेले नाहीत, असेही त्यांना स्पष्ट केले.
मुंबई पोलिसांच्या दहशतीमुळे गायब
राज्य सरकारसाठी सर्वौच्च न्यायालयाचा हा मोठा धक्का मानला जात आहे. जर मी चूक केली असेल तर माझ्यावर देखील कारवाई व्हावी, असे सिंह यांनी म्हटले. परमबीर सिंह यांनी पाठवलेले पत्र मागे घ्यायला सांगितले गेले आणि गृहमंत्र्यांच्या बाबतीत शांत राहायला सांगितले. परमबीर सिंह यांच्या वकिलांनी न्यायालयात तसे स्पष्टीकरण दिले. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. सिंग यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून अटकेपासून संरक्षण देणारी याचिका केली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सिंग यांच्या वकिलांना सुनावले होते. परमबीर सिंग कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती न्यायालयाला द्या, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले होते. परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत.
(हेही वाचा परमबीर सिंग आहेत कुठे? सर्वोच्च न्यायालयाने खडसावून विचारले)
Join Our WhatsApp Community