Supreme Court : अजित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का!

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शरद पवार यांचे नाव आणि त्यांचा फोटो वापरला जात आहे. शरद पवार यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी असे केले जात असल्याचे सिंघवी यांनी कोर्टात सांगितले.

374
Supreme Court : घड्याळ चिन्ह अजित पवार गटच वापरणार

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांना जबरदस्त धक्का दिला आहे. ‘तुमचा पक्ष शरद पवार यांचे नाव आणि त्यांचा फोटो वापरणार नाही’, अशी हमी देणारे प्रतिज्ञापत्र सोमवारपर्यंत न्यायालयात दाखल करा असे आदेश गुरुवारी (१४ मार्च) न्यायालाने दिले आहे. (Supreme Court)

सविस्तर वृत्त असे की, निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हाच खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस असल्याचा निकाल दिला होता. शरद पवार गटाने आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केली होती. न्यायमूर्ती न्यायाधीश सूर्यकांत आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या न्यायालयापुढे आज या याचिकेवर सुनावणी झाली. ज्येष्ठ विधीतज्ज्ञ मनु अभिषेक सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडली. (Supreme Court)

(हेही वाचा – Indrayani River : इंद्रायणी झाली प्रदूषित; शेकडो मृत माशांचा खच)

प्रतिज्ञापत्र सोमवारपर्यंत कोर्टात दाखल करा – सर्वोच्च न्यायालय

अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शरद पवार यांचे नाव आणि त्यांचा फोटो वापरला जात आहे. शरद पवार यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी असे केले जात असल्याचे सिंघवी यांनी कोर्टात सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवारांचा फोटो असलेली अजित पवार गटाची पोस्टरही दाखवलेत. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वत:च्या नावाने मते मागावी. शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव कशाला वापरता? असा सवाल सिंघवी यांनी उपस्थित केला. (Supreme Court)

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुध्दा अजित पवार यांच्या पक्षाला कानपिचक्या दिल्या. वेगळे होण्याचा निर्णय तुम्ही घेतला होता. आता त्यावर ठाम राहा. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला. शरद पवारांचे नाव व फोटो वापरणार नाही, अशी हमी देणारे प्रतिज्ञापत्र सोमवारपर्यंत कोर्टात दाखल करा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Supreme Court)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.