‘या’ तारखेला ठरणार शिंदे गट पात्र की अपात्र, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

93

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद उभा ठाकला आहे. याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान मंगळवारी पक्षचिन्ह कोणाचे याबाबतचा निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.

त्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागला असून आता शिंदे गटाच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 1 नोव्हेंबरला याबाबतची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात घेण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालयात काय निकाल देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचाः ‘माझे भाषण पूर्ण ऐका…’, मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानाचा पंकजा मुंडेंनी केला खुलासा)

अपात्रतेसंदर्भात याचिका

20 जून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील आमदारांनी बंड करत सुरत गाठले. त्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटाला एकावर एक धक्के देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिला.

दरम्यान, शिंदे गटाने उपाध्यक्षांविरोधातच अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. दरम्यान शिंदे गटाच्या अपात्रतेसंबंधात ठाकरे गट आक्रमक असून न्यायालयात या विषयावर आता सुनावणी होणार आहे.

(हेही वाचाः ‘अक्कल नसलेल्या मूर्खांना मी उत्तर देत नाही’, फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर)

सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय

पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याची निवडणूक आयोगाला परवानगी देण्यात येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात न्यायालय हस्तक्षेप करू शकणार नसल्याचे न्यायालयाने यावेळी म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.