Supreme Court: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ‘असा’ झाला युक्तीवाद

सर्वोच्च न्यायालयात 4 ऑगस्टला एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील शिवसेना यांच्यातील परस्पर पाच महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी सुरु आहे. गुरुवारी या खटल्याची सुनावणी सुरु झाल्यानंतर, पहिल्यांदाच एकनाथ शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी युक्तीवाद केला. एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईपासून त्यांनी न्यायालयासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:

सुनावणीतले काही महत्त्वाचे मुद्दे

  • पक्षाच्या विरोधात सदस्यांनी मतदान केले असते तर 10 व्या परिशिष्टानुसार, विधानसभा अध्यक्षांना अपात्रेतेची कारवाई करता आली असती, पण यात तसे झालेले नाही.
  • राजकीय पक्षांकडे असे दुर्लक्ष करता येणार नाही, न्यायाधीशांचे मत, तर शिंदे गटातील आमदारांनी पक्ष सोडलेला नाही साळवेंचा युक्तीवाद
  • पक्षविरोधी काम करत आहेत या स्वत:च्या धारणेवरुन सदस्यांना अपात्र ठरवू शकतात का? साळवेंचा सवाल
  • आमच्यासाठी बंडखोर आमदार अपात्र, अपात्र ठरलेले लोक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत, ठाकरे गटाकडून सिब्बल यांचा युक्तीवाद, दोन गट मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाहीत का? न्यायालयाचा सवाल
  • शिंदे गटातील आमदारांकडून राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यात गल्लत केली जाते आहे, सिब्बल यांचा युक्तिवाद
  • पक्षाच्या चिन्हाबाबात कोणताही निर्णय नको, सर्वोच्च न्यायालयाचे आयोगाला आदेश, गुरुवारची सुनावणी संपली
  • सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय; सर्वोच्च न्यायालय
  • महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवार, 8 ऑगस्ट रोजी सुनावणी , आयोगाने नोटिशीबाबत वेळ वाढवून द्यावा, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

( हेही वाचा: पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश )

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here