देशात लोकसभा (Lok Sabha Elections) निवडणुकीचा (Supreme Court) आज (२६ एप्रिल) दुसरा टप्पा सुरू आहे. देशभरातील ८८ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. अशातच देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एक महत्त्वूपर्ण याचिका दाखल झाली आहे. मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांच्या यादीखाली ‘नोटा’चा पर्याय दिलेला असतो. वरीलपैकी एकही उमेदवार योग्य वाटला नसल्यास या पर्यायाला मतदान करून मतदार आपली असहमती दर्शवत असतात. (Supreme Court)
(हेही वाचा –Lok Sabha Election Phase 2: आठ मतदारसंघात आतापर्यंत किती टक्के मतदान? वाचा सविस्तर)
‘नोटा’ या पर्यायाला जर सर्वाधिक मतदान झालं तर पुढे काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. नोटाला केलेले मतदान वाया जाते, असेही अनेकांचे मत आहे. त्यामुळेच नोटाला जर सर्वाधिक मतदान मिळाले, तर त्या मतदारसंघातील निवडणूकच बाद ठरविण्यात यावी, अशी मागणी करणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.
(हेही वाचा –EVM-VVPAT Case: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश, जाणून घ्या…)
Supreme Court issues notice to ECI on a plea seeking direction to frame rules to the effect that if NOTA gets a majority, the election held in the particular constituency shall be declared null and void and a fresh election shall be conducted to the constituency.
The plea also… pic.twitter.com/GdLHfJ8Nk5
— ANI (@ANI) April 26, 2024
एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रकरणात आता निवडणूक आयोगाला (Election Commission) नोटीस बजावली असून त्यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नोटापेक्षा कमी मते मिळविणाऱ्या उमेदवारांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी सर्व निवडणुका लढविण्यापासून बंदी घालण्यात येईल, असे नियम तयार करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community