राज्यात विधानसभा निवडणूकीचे (Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून, निवडणूक मुख्य आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी महाराष्ट्र राज्यातील मतदान एकाच टप्प्यात होणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान पक्षाच्या चिन्हावरुन वाटाघाटी सुरू असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह हे घड्याळच राहणार आहे. सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना दिलासा दिला आहे. (Supreme Court)
शरदचंद्र पवार गटाने (Sharadchandra pawar Group) अजित पवार यांच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ वापरण्याची परवानगी देऊन नये अशी मागणी केली होती. ही मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. तूर्तास तरी अजित पवार गटाकडे घड्याळ चिन्ह राहणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय आहे.
(हेही वाचा – NCP Star Campaigner : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्याचे नाव वगळले )
अजित पवार (Ajit Pawar NCP) पक्षाचं चिन्ह हे घड्याळ राहणार आहे. शरद पवार गटाकडून करण्यात आलेली याचिका स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ‘घड्याळ तेच वेळ नवी’ दादांचं वाक्य अखेर ठरलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि निवडणूक चिन्ह दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मागील काही महिन्यांपासून या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली जात होती. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community