Supriya Sule यांनी Devendra Fadnavis यांच्यावर टीका केली अन् अंगलट आली…

195
Supriya Sule यांनी Devendra Fadnavis यांच्यावर टीका केली अन् अंगलट आली...
  • खास प्रतिनिधी

शासकीय कामासाठी पाठपुरावा आवश्यक असतो, अशा अर्थाने सरकारी फाइलला धक्का मारावा लागतो, त्याशिवाय ती पुढे जात नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी, १० सप्टेंबरला नागपुरातील एका कार्यक्रमात दिली. त्यावर राष्ट्रवादी (शप) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ‘X’ वर पोस्ट करत टीका केली आणि ‘हात दाखवून अवलक्षण’ याप्रमाणे त्यांनी केलेली टीका त्यांच्याच अंगलट आली. नेटकाऱ्यांनी त्यांच्यावरच टीकेची झोड उठवली.

काय म्हणाल्या सुप्रियाताई?

“चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की त्यांच्या सरकारचा वेग गोगलगायीचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो, असंही त्यांनी कबूल केलेय. थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतीमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय? थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले द्रष्टेपणाने म्हणालेच होते – ‘विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।’ खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले. या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले म्हणजेच वित्त गेले. वित्त नाही म्हणून शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊ शकत नाही.” या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पोस्ट वर लोकांनी त्यांनाच उलट प्रश्न करून भंडावून सोडले.

(हेही वाचा – Shimala येथे बेकायदा मशिदीच्या विरोधात शेकडो हिंदू उतरले रस्त्यावर)

.. तर जनते समोर उघडे पडतील

“दुसऱ्यांच्या फाईल्स काढण्यापेक्षा तुम्ही किती फाइल्स लपवून ठेवल्या ते सांगा.. फणवीस साहेबांनी ठरवलं तर बाप लेकीच्या सगळ्या फाईल्स बाहेर काढतील,”, “शरद पवार गटाची अवस्था अशी झाले की, फाईल उघडली तर जनते समोर उघडे पडतील..”, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात तर फाईल फिरून फिरून दिल्लीमध्ये जायच्या, हे सुद्धा सांगायला विसरू नका,” अशा तिखट प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या.

आग लागून भस्म व्हायच्या

“ताई तूम्ही पण इतकं खर बोलण्याचे धाडस दाखवा. तुमच्या सरकार मध्ये फाईलच गायब होत असते त्याच काय? इथे हळूहळू फाईली पुढे सरकत तरी आहेत तुमच्या वेळी फाईल पुढे सरकून direct वसुली आघाडीच्या घशात जात होत्या,” असा टोला एकाने हाणला. “तुमच्या फाइल तर दिसायच्या पण नाहीत कुणाला .. मंत्रालयाला आग लागून भस्म व्हायच्या,” अशी आठवण करून दिली. (Supriya Sule)

(हेही वाचा – Rakesh Wadhawan : ‘एचडीआयएल’ ६ कोटींचे साहित्य १८ लाखात विकले; वाधवन यांची पोलिसांत तक्रार)

मुख्यमंत्रीच घरात बसत होता

काहींनी “तुमच्या सरकार मध्ये जागेवरच राहायची मुख्यमंत्रीच घरात लपून बसत होता. म्हणून त्याला बाजूला केले का आता?”, “कपाटात ठेवण्यापेक्षा बरंच म्हणायच! नाही तर #उद्धट_अन_पप्पाच्या काळात नुसती स्थगित चालु होती ! करा आराम, काळजी घ्या, तुम्ही पण कायम भावी,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली.

पवारांना देव आठवले

नेटकऱ्यांनी शरद पवार यांनाही सोडले नाही. “फाईलवर सह्या करायला लखवा कुणाच्या सरकारात मारला होता हे आठवतं का? की सोयीस्करपणे विसरलात,”, “पण महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे. शरद पवारांना देव आठवले.!! महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. चाळीस वर्षांत पहिल्यांदा असे घडले… याला राजकीय पोळी भाजणे म्हणतात..” अशी टिप्पणी काहींनी केली. (Supriya Sule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.