तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल वाईट वाटत असेल, तर त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करा, त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी करा. नेहमीच गेल्या ६० वर्षांत त्यांच्यावर किती अन्याय झाला हे सांगणे गरजेचे नाही. तुम्हाला देखील सत्तेत येऊन सात वर्षे झाली आहेत. झाले ते सोडून देत तुम्ही का त्यांना मदत करत नाही, अशी विचारणा करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
वर्तमान काळात जगावे
सरकारने अर्थसंकल्पात विस्थापित काश्मिरींसाठी काहीही केले नाही, गेल्या ६० वर्षांत जे घडले ते घडले, पण पुढची किती वर्षे तुम्ही तेच बोलणार आहात. तेच ते ऐकून आता कंटाळा आला आहे, अशा प्रकारे लोकसभेत जम्मू आणि काश्मीरच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. एखादे मूल जर कुपोषित असेल तर त्याची आई त्याला सात वर्षात चांगले खायला देईल आणि त्याला निरोगी करेल, कुपोषणातून बाहेर काढेल, माझे मूल कुपोषित आहे, असे सांगत फिरणार नाही, असे उदाहरण देत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुनावले. तसेच सरकारने भूतकाळात न जगता वर्तमान काळात जगावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
(हेही वाचा तर 2040 मध्ये भारताचा पंतप्रधान मुसलमान असेल! रणजित सावरकरांनी दिला धोक्याचा इशारा)
Join Our WhatsApp Community