देशातील टॉप टेन खासदारांच्या यादीत महाराष्ट्र अग्रेसर! सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेसह आणखी दोघांचा समावेश; नंबर वन कोण?

87

देशातील टॉप टेन खासदारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला खासदार सुप्रिया सुळे या पहिल्या क्रमांकावर आहेत. यासोबतच या यादीमध्ये राज्यातील आणखी ३ खासदारांचा समावेश असल्याने यंदा या यादीत महाराष्ट्राने बाजी मारली आहे.

( हेही वाचा : माहीम येथील अनधिकृत बांधकामावर हातोडा! जेसीबीच्या सहाय्याने कारवाई)

देशातील टॉप टेन खासदारांची यादी

या खासदारांच्या यादीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांचा समावेश असून श्रीरंग बारणे दुसऱ्या, श्रीकांत शिंदे ८ तर राहुल शेवाळे ९ व्या क्रमांकावर आहेत.

देशातील खासदारांच्या संसदेतील कामगिरीवरून ही टॉप टेन यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या चार खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील जास्त खासदार यात समाविष्ट आहेत. अहवालामध्ये विविध निकषांवर संसदेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन करून त्यानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात येते. तसेच सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्येही सुप्रिया सुळे प्रथम क्रमांकावर आहेत. तसेच सर्वाधिक खासगी विधेयक मांडणाऱ्या खासदारांमध्ये गोपाल शेट्टी नंबर वनवर आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.