Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना…

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे प्रचार करत असताना त्यांना विरोधकांकडून घेराव घालून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा मिळावी, अशी मागणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

271
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना...
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना...

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यात संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha Constituency) दररोज घडामोडी घडताना पहा याला मिळत आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार अशी. परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे प्रचार करत असताना त्यांना विरोधकांकडून घेराव घालून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा मिळावी, अशी मागणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्र काढून ही मागणी केली आहे.

(हेही वाचा – Satara Loksabha Election : साताऱ्यातील तिढाही कायम; भाजपच्या उदयनराजेंविरुद्ध उमेदवार देण्यावर अजित पवार गट ठाम)

करावा लागतो दडपशाहीचा सामना 

सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) प्रचारार्थ आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. ते दोघेही संविधानिक पध्दतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे.

संवेदनशील महाराष्ट्रात हे योग्य नाही

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असे घडणे शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे. सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही.

यामुळे आपणाकडून रोहित पवार व युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी, ही विनंती सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे ग्रामीण अधीक्षकांकडे केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.