राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाने दि. ३० ऑक्टोबर रोजी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या स्टार प्रचारांच्या यादीत शरद पवार (Sharad Pawar) पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि तिसऱ्या क्रमांकावर सुप्रिया सुळेंचे (Supriya Sule) नाव आहे. त्यामुळे पक्षाच्या राजकीय भवितव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिया ताईंची (Supriya Sule) पिछेहाट झाल्याची चर्चा आहे. (Supriya Sule)
( हेही वाचा : Crime News : नाकाबंदीत कसारा घटाच्या पायथ्याशी सापडले 2 कोटीचे घबाड)
दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पक्षाची बाजू लावून धरणारे आमदार रोहित पवार यांना १७ व्या नंबरवर स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळाले आहे. तर शरद पवारांनी (Sharad Pawar) पक्षाच्या अध्यक्ष पदांचा राजीनामा दिल्यानंतर ढसाढसा रडणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना ४ नंबरवर स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. (Supriya Sule)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community