मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे आमदार लवकरच अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लागेल, असा दावाही विरोधक करत आहेत.अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार बरोबर घेऊन तीन महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. (Supriya Sule)
याबद्दल बोलताना देवेंद्र फेडणवीस म्हणाले की
“पहिली गोष्ट म्हणजे सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू असे वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
(हेही वाचा : Abu Azami : आयकर विभागाने वाढवल्या अबू आझमींच्या अडचणी)
तर पहिला हार घेऊन मी जाईन
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांचं अभिनंदन करायला पहिला हार घेऊन मी जाईन. असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केले. यावेळी त्या म्हणाल्या की , देवेंद्र फडणवीस जे काही बोलले त्याचं मी स्वागत करते. पण ते अजित पवारांना पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी ठेवणार म्हणालेत ना? म्हणजे आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आणि फडणवीसांच्या म्हणण्यानुसार पुढची पाच वर्ष अजित पवार मुख्यमंत्री होणार, तर मला आनंद आहे. अजित पवार पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असतील तर याचा मला आनंद आहे. दादा पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना पहिला हार घालायला मी जाईन.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community