बारामती (Baramati) मतदारसंघ गेले अनेक आठवडे चर्चेत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शह देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट एकमेकांसमोर आले आहेत.
(हेही वाचा – Maadhavi Latha : ओवैसींच्या विरोधात लढणार भाजपच्या माधवी लता; मुसलमानांविषयी म्हणतात…)
जळोची काळेश्वर मंदिरात समोरासमोर
लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यात बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रचारही चालू केला आहे. सुप्रिया सुळे यांनीही बारामतीतच तळ ठोकला आहे. प्रचार चालू असतांना ८ मार्च रोजी बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदिरात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार समोरासमोर आल्या. त्या वेळी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) सुनेत्रा पवार या देखील चांगल्याच ॲक्टिव झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी गावभेट दौरे सुरू केले आहेत. तसेच इतर तालुक्याचे दौरे देखील करत त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदार संघात दौरे सुरू केले आहेत. गावच्या जत्रांमध्ये देखील सुप्रिया सुळे आता जाताना दिसत आहेत. पवार कुटुंबाचे एकमेकांशी असलेले नाते महाराष्ट्राने पाहिले आहे. ती पार्श्वभूमी आणि आजची गळाभेट यांची पुन्हा चर्चा चालू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community