‘कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी सिने अभिनेता शाहरुख खान याच्या मुलांचे समर्थन करणाऱ्या सुप्रिया सुळे या घोरपडी येथील माझ्या पीडित बहिणीला भेटायला कधी येणार? असा सवाल भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी पुण्यात आंदोलनावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना केला आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंचर जिल्ह्यात लव्ह जिहाद प्रकरण घडल्याचा दावा नुकताच केला होता, तसाच प्रकार पुण्यातील घोरपडी येथे एका तरुणीसोबत घडल्याच्या दावा नितेश राणे यांचा आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी नितेश राणे यांनी आज पुण्यात आंदोलन केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संतप्त सवाल केला आहे.
(हेही वाचा Shivrajyabhishek : शिवप्रेमींनी सिंहगडावर अनुभवला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सुवर्णक्षण)
सुप्रिया सुळेंचे ‘ते’ वक्तव्य?
आर्यन खान प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, जे घडले ते एक आई म्हणून वाईट वाटते. ज्याच्याकडे काहीच सापडले नाही त्याला 26 दिवस कोठडी ठेवण्यात आले, हा कुठला न्याय? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितीत केला होता. त्यांनी आर्यन खानची पाठराखण केली होती.
सुळेंच्या वक्तव्याचा राणेंकडून समाचार
सुप्रिया सुळेंनी शाहरुख खान याच्या मुलाबाबत केलेल्या वक्तव्याची आठवण नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंना करुन दिली. शाहरुख खानच्या मुलांचे समर्थन करणाऱ्या सुप्रिया सुळे या घोरपडीतील माझ्या पीडित बहिणीला कधी भेटायला येणार, असा सवालही भाजप आमदार नीतेश राणेंनी खासदार सुप्रिया सुळेंना केला आहे.
Join Our WhatsApp Community