बारामती अॅग्रोप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी विधानभवनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन ते ईडी कार्यालयाकडे गेले. त्यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे गेल्या होत्या. त्यांनी रोहित पवारांना यावेळी संविधानाची प्रत भेट दिली. रोहित पवारांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. हा काळ आमच्या संघर्षाचा काळ आहे. रोहित पवार नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतोय. ‘सत्यमेव जयते. विजय हा सत्याचाच होईल. हा काळ संघर्षाचा आहे. आव्हान येत आहेत, पण आम्ही आव्हानांवर मात करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो. रोहित पवारांना नोटीस येणं ही आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. त्यांनी संघर्ष यात्रा काढली. शेतकरी, कष्टकरी, शोषित, विद्यार्थी यांच्यासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई होत आहे, सुडाचे राजकारण केले जात आहे, अशी चर्चा अनेकदा माझ्या कानावर आल्या आहेत.
(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : ‘विराट’शिवाय खेळणारा भारतीय संघ असा करतोय कसोटीचा सराव)
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, “केंद्राच्या एका अधिकृत डेटानुसार इनकम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या 90 टक्के केसेस विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात आहेत. रोहित पवारांनी संघर्षयात्रा काढली होती. कदाचित हे त्याचंच सूडाचं राजकारण असू शकतं. हे शक्तीप्रदर्शन नाही. यात प्रेम आणि नाती आहेत. कार्यकर्त्यांना त्यांच्या भावासाठी इथे यावंसं वाटतंय. आम्ही काही चूक केली नसेल, तर तपासाच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही”.
चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष असावी
यानंतर त्या म्हणाल्या की, “चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष असावी. माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की, ते रोहितची बाजू ऐकतील. आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत; कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community#WATCH | As NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar is being questioned by ED, NCP working president Supriya Sule says “Investigation must be transparent and fair. I have full faith in the ED and I am sure they will hear Rohit’s side. We are going to completely cooperate with… pic.twitter.com/vSbaFc5pmP
— ANI (@ANI) January 24, 2024