या वर्षाच्या सुरुवातीला येत्या २-३ महिन्यांत लोकसभा आणि नंतर लगेचच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आतापासूनच त्यांचा मतदारसंघ बारामतीमध्ये पुढचे १० महिने मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) टीका केली आहे.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
अजित पवार यांनीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अमोल कोल्हे यांना निवडून आणले आहे. आता अजित पवार सोबत नाही म्हटल्यावर सुप्रिया सुळे यांनी बारामती या त्यांच्या मतदार संघाकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांना बारामतीमध्ये तळ ठोकावा लागत आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या मागील १५ वर्षे केवळ अजित पवार यांच्यामुळे निवडून आल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल, असा दावाही चाकणकर यांनी केला. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्हाला काम करावे लागेल. आमचे स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला आहे, अशी रुपाली चाकणकर म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community