अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचे उत्तर; “आम्ही मुली…”

214
अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचे उत्तर; "आम्ही मुली..."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि पर्यायाने राज्यातल्या राजकारणासाठी बुधवार ५ जुलै हा दिवस फार महत्वाचा ठरला. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनी संपूर्ण ताकदीने आप-आपली बाजू मांडली. शरद पवार गटाकडून आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तर अजित पवार गटाने वांद्रयाच्या एमईटी कॉलेज येथे सभा आयोजित केली होती. या सभेला संबोधित करतांना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावरून, त्यांच्या निवृत्तीच्या मुद्द्यावरून टीका केली. त्यांच्या त्या टीकेला आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.

“साहेब वय झालं, कधी थांबणार?, आता आम्हाला आशीर्वाद द्या” असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. यावरून सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर पलटवार केला. रतन टाटा, सीरम इन्स्टिट्युचचे सायरस पुनावाला, अमिताभ बच्चन, वॉरेन बफेट, फारूख अब्दुल्ला यांचा उल्लेख करत आपण लढलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(हेही वाचा – NCP Crisis : राजीनामा परत घ्यायचा होता तर दिला कशाला? अजित पवारांचा थेट सवाल)

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “तुम्ही वडिलांना म्हणायचं तुम्ही घरी बसा आणि आशिर्वाद द्या. मग आम्ही पोरी परवडल्या हो. घरामध्ये विचारून बघा. सगळ्या पुरुषांबद्दल मी बोलत नाही. वडिल किंवा आई आजारी पडते तेव्हा कोण नेतं डॉक्टरांकडे? मुली करतात की नाही? जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते तेव्हा लेक उभी राहते. तुमच्या लेकी बहिणीही तशाच आहेत. त्यामुळे या परिस्थितीत काही डगमगायची गरज नाही. आपण पक्ष बांधू, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी उपस्थित कार्यकर्ते आणि नेत्यांना दिला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.