Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या स्टार प्रचारकाचे अजित पवारांना समर्थन

264

बारामती लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचा करिष्मा दिसून आला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा प्रचार जोरात सुरू असतानाच, फडणवीसांनी त्यांच्या स्टार प्रचारकालाच गळाला लावले आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघाचे चित्र पूर्णतः बदलले आहे.

सोनई डेअरीचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचे सुपूत्र प्रवीण माने हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात. दुधसंघ आणि अन्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून ते पुणे जिल्ह्यात वर्चस्व टिकवून होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते शरद पवारांसोबत राहिले. किंबहुना लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच त्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचाराला सुरुवात केली होती. अशावेळी इंदापूर दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माने कुटुंबीयांची भेट घेताच त्यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा The Diary Of West Bengal चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी दहशतवाद्यांकडून चित्रपट निर्मात्याला धमक्या)

यामागील भूमिका स्पष्ट करताना दशरथ माने म्हणाले, या भागाचा विकास कोण करून शकतो, हे लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. शरद पवारांनी घेतलेली भूमिका ही राहुल गांधींना पंतप्रधान करणारी आहे. त्यामुळे ते माझे कितीही जवळचे असले, तरी मी त्यांना विरोधच करणार. राष्ट्रहिताला प्राधान्य देणार”, असेही त्यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.