मोदी या आडनावावरून विनोद केल्यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०१९ मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरत न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. मोदी आडनावावरून राहुल गांधींनी टीका केली होती.
( हेही वाचा : वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींना सत्ताधारी आमदारांनी मारले जोडे)
राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून टीका केली होती. यामुळे राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यासंदर्भात सुरतच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला असून राहुल गांधींचा जामीन मंजूर झाला आहे.
Join Our WhatsApp CommunityGujarat | Surat District Court sentenced Congress MP Rahul Gandhi to two years of imprisonment in the criminal defamation case filed against him over his alleged ‘Modi surname’ remark.
He was later granted bail by the court. https://t.co/qmGNBIMTaF
— ANI (@ANI) March 23, 2023