Suresh Dhas Apologies Prajakta Mali आमदार सुरेश धस यांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी

161

आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं (Prajakta Mali) नाव घेतलं होतं. याप्रकरणी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त करत सुरेश धस यांनी आपली माफी मागवी अशी मागणी केली होती. तसेच महिला आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. (Suresh Dhas Apologies Prajakta Mali)

प्राजक्ता माळी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरेश धस (Suresh Dhas statement) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.”प्राजक्ता माळीबाबत मी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता. मी त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ता माळीसह सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाल्याने त्यांचं किंवा कोणत्याही महिलेचं मन दुखावलं असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो,” असं सुरेश धस म्हणाले आहेत.

(हेही वाचा – Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण)

सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी आपली भूमिका मांडली. सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर मी प्राजक्ता ताईंचा अपमान होईल असं बोललो नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर याच संदर्भात प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. अखेर आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागितली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.