सुरेश धस यांनी माफी मागावी, अन्यथा…; अभिनेत्री Prajakta Mali ने दिला इशारा

159

गेल्या दोन दिवसांपासून बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा चालू असून राजकीय वर्तुळात यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यादरम्यान, या प्रकरणात थेट अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिचे नाव आमदार सुरेस धस यांनी घेतले. धस यांनी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने केली.

काय म्हणाली प्राजक्ता माळी?

सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमांबाबत आणि इव्हेंट पॉलिटिक्सबाबत केलेल्या विधानाचा प्राजक्ता माळीने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला. गेल्या दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. सगळे ट्रोलिंग, सगळ्या नकारात्मक कमेंट्सना मी सामोरी जात होते. पण माझी शांतता म्हणजे या सगळ्याला माझी मूक संमती नाही. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणे तुम्हा सगळ्यांमुळे आमच्यावर ओढवले आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्या दोन वाक्यांचे हजारो व्हिडीओ होतात. तेवढेच शब्द पकडले जातात. त्यावरून यूट्यूब चॅनल्सवर हजारो व्हिडीओ बनतात. मग एका सेलिब्रिटीला त्यावर विधान करायला भाग पाडले जाते. मग समोरची व्यक्ती पुन्हा बोलते. ही चिखलफेक चालू राहते, असेही प्राजक्ता माळी (Prajakta Mali) म्हणाली.

मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी 

या प्रकरणी आपण सुरेश धस यांच्या विरोधात महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, तसेच दोन दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार आहे. त्यानंतरही काही कारवाई झाली नाही तर आपण कायदेशीर मार्ग अवलंबणार, असेही प्राजक्ता माळी म्हणाली. एक कलाकार म्हणून नाव कमावताना किती कष्ट करावे लागते, मात्र स्वतःला प्रसिद्धी मिळ्वण्यासाठी, टीआरपी मिळवण्यासाठी महिला कलाकारांच्या नावाचा उपयोग केला जातो तेव्हा महिलांचे खच्चीकरण होते, ही निंदनीय बाब आहे. अशा प्रकारे सोशल मीडियातून कोणत्याही पुराव्याच्या आधारे जर बातम्या आणि पोस्ट केल्या जात असतील तर त्यावरही अंकुश ठेवण्यासाठी सरकारने योग्य ते निर्देश द्यावेत, असेही प्राजक्ता माळी (Prajakta Mali) म्हणाली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.