Suresh Gopi : भाजपाच्या केरळमधील खासदाराने वाढवली चिंता; काल शपथ, आता म्हणतात, मला पदमुक्त करा…

मला केवळ खासदार म्हणून काम करत रहायचे आहे. मी त्यांच्याकडे (पक्षश्रेष्ठींकडे) काहीच मागितले नव्हते. मी त्यांना म्हटले होते की, मला या पदाची आवश्यकता नाही, असे Suresh Gopi यांनी म्हटले आहे.

330
Suresh Gopi : भाजपाच्या केरळमधील खासदाराने वाढवली चिंता; काल शपथ, आता म्हणतात, मला पदमुक्त करा...
Suresh Gopi : भाजपाच्या केरळमधील खासदाराने वाढवली चिंता; काल शपथ, आता म्हणतात, मला पदमुक्त करा...

NDA प्रमुख नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एकूण ७२ खासदारांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये केरळमधील (Kerala) भाजपाचे पहिले आणि एकमेव खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांचादेखील समावेश आहे. गोपी यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली; परंतु आता त्यांनी मंत्रीपदाची अपेक्षा नसल्याचे वक्तव्य केले आहे. आता ते मंत्रीपद सोडण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Gold Bracelet For Women : मैत्रिणींनो, सोन्याचं ब्रेसलेट घ्यायचं आहे? मग या उपयुक्त टिप्स जरुर वाचा)

शपथविधी समारंभानंतर सुरेश गोपी यांनी नवी दिल्लीत एका मल्याळम वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मंत्रीपदापेक्षाही चित्रपट पूर्ण करणे हे त्यांचे प्राधान्य असल्याचे वक्तव्य केले आहे.

माझे चित्रपट करायचे आहेत

सुरेश गोपी म्हणाले की, “मी काही चित्रपट साईन केले आहेत आणि मला ते करायचे आहेत. मी माझा मतदारसंघ त्रिशूरचा (Thrissur) खासदार म्हणून काम करत राहणार आहे. मला केवळ खासदार म्हणून काम करत रहायचे आहे. मी त्यांच्याकडे (पक्षश्रेष्ठींकडे) काहीच मागितले नव्हते. मी त्यांना म्हटले होते की, मला या पदाची आवश्यकता नाही. मला वाटते की, लवकरच पदमुक्त होईन. मात्र त्रिशूरमधील मतदारांचं मी नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्यासाठी आणि मतदारसंघासाठी मी काम करत राहीन. माझ्या मतदारांनाही याची कल्पना आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की, मी त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करेन आणि त्यांनाही याची कल्पना आहे. म्हणूनच तर त्यांनी मला त्यांची मौल्यवान मतं दिली आहेत. मात्र मला मंत्रीपद सांभाळता येणार नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत मला माझे चित्रपट करायचे आहेत.”

कोण आहेत सुरेश गोपी ?

सुरेश गोपी हे मुळचे केरळमधील अलप्पुझा येथील रहिवासी आहेत. कोल्लम येथून त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यांनी बालवयापासूनच मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या कलियाट्टम या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून काही टीव्ही शो होस्ट करत आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश गोपी हे त्रिशूर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते केरळमधील भाजपाचे पहिले खासदार आहेत. त्रिशूरमध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा ७४,६८६ मतांनी पराभव केला आहे. लोकसभेवर निवडून जाण्यापूर्वी सुरेश गोपी (Suresh Gopi) राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. २०१६ ते २०२२ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.