नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पायाला गंभीर दुखापत
5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार होता. पण शुक्रवारी हा दौरा रद्द करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याचे ट्वीट करत राज ठाकरे यांनी ही घोषणा केली. पण आता त्यामागचे कारण समोर येत आहे. राज ठाकरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित! जाणून घ्या ‘राज’ की बात…)
पुण्यातील सभा होणारच…
दरम्यान, राज ठाकरे यांची पुण्यातील सभा २२ मे रोजी होणार आहे. यापूर्वी राज ठाकरेंची सभा २१ मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानात होणार होती. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे राज हे मुंबईला रवाना झाले, असे सांगण्यात आले. ही सभा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र आता राज यांची सभा २२ मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
(हेही वाचाः अटकपूर्व जामीन मंजूर होताच संदीप देशपांडे, धुरी ‘शिवतीर्था’वर!)
Join Our WhatsApp Community