Donald Trump Surrender : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ओढवली शरणागती पत्करण्याची नामुष्की

170
Donald Trump Surrender : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ओढवली शरणागती पत्करण्याची नामुष्की
Donald Trump Surrender : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ओढवली शरणागती पत्करण्याची नामुष्की

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 24 ऑगस्टला फसवणूक आणि 2020 च्या जॉर्जिया येथील निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली जॉर्जियातील फुल्टन काउंटी तुरुंगात अटक करण्यात आली. 20 मिनिटांनंतर वकिलांनी वाटाघाटी केल्यानंतर 200,000 अमेरिकी डाॅलरच्या बाँडवर सोडण्यात आले. या प्रकरणात सह-प्रतिवादी किंवा साक्षीदारांना धमकावण्यासाठी सोशल मीडियाचा वापर न करण्याची अट ट्रम्प यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. सुटका होताच डोनाल्ड ट्रम्प विमानतळाकडे रवाना झाले. तेथून ते न्यू जर्सीला जातील. 2020 च्या निवडणुकीत जॉर्जिया राज्यातील मते आपल्य बाजूने वळवण्यसाठी तेथील अधिकाऱ्याला फोन केला होता. त्या फोन कॉलचा पहिला रिपोर्ट वॉश्गिंटन पोस्ट या स्थानिक वृत्तपत्राने प्रसिद्ध केला त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

(हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन)

ट्रम्प जॉर्जियामध्ये 13 वेगळ्या खटल्यांचा सामना करत आहेत. यामध्ये फसवणुकीचे आरोप, खोटी विधाने यांसह अनेक प्रकरणांचा समावेश आहे. यापूर्वी ट्रम्प यांचे माजी सहकारी मार्क मीडोज यांनी फुल्टन काउंटीमध्ये आत्मसमर्पण केले होते. त्यांना अटक करण्यात आली आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या 18 सह-प्रतिवादींपैकी मीडोज एक आहेत. जॉर्जियामध्ये शरणागती पत्करण्याची ट्रम्प यांची ही या वर्षातील चौथी वेळ आहे. शरणागती पत्करल्यानंतर 20 मिनिटांसाठी ते जेलमध्ये होते. या दरम्यान त्यांचा मग शॉट (Criminal Mugshot) म्हणजे कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. अमेरिकन कायद्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या चेहऱ्याचे फोटो काढणे याला मग शॉट म्हणतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत हा फोटो देखील शेअर केला आहे. अमेरिकेत या घटनेचे पडसाद मोठ्या उमटत आहेत. या घटनेच्या अहवालात असे म्हटले आहे की, ट्रम्प तुरुंगात आल्यावर त्यांचे बरेच समर्थक बॅनर आणि अमेरिकन झेंडे फडकावत त्यांची झलक पाहण्यासाठी जमले होते. त्यामध्ये जॉर्जियाच्या अमेरिकेच्या प्रतिनिधी मार्जोरी टेलर ग्रीन होत्या. त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वात निष्ठावंत मानल्या जातात.

कधीही आत्मसमर्पण करू नका – डोनाल्ड ट्रम्प 

आज जे काही घडले ते न्यायाचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया सुटकेनंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच ट्वीटद्वारेही ‘कधीही आत्मसमर्पण करू नका’, असे म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.