SushilKumar Shinde यांच्या आत्मचरित्रात वीर सावरकरांची प्रशंसा; काँग्रेसचे टोचले कान

मी स्वत: मागासवर्गातील असल्याने सावरकरांच्या प्रयत्नांचे मला विशेष महत्त्वं वाटते. सावरकरांचा मुद्दा निघाला की त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का दिला जातो, याचं मला आश्चर्य वाटतं. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

192
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सवंग प्रसिद्धीसाठी कायम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात. यामुळे त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यातील काही प्रकरणात न्यायालयाने समन्सही बजावले आहेत. तरीही वीर सावरकर यांच्यावर टीका करून तोंडघशी पडण्याची राहुल गांधी यांची सवय जात नाही. काँग्रेसची विचारधाराच सावरकरांना विरोध करण्यावर उभारलेली, अशा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी कान टोचले आहेत. ‘अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मुख्य प्रयत्न झाले होते. त्यामुळे सावरकर हे विज्ञानवादी होते. मात्र आता काँग्रेसची विचारसरणी सुधारण्याची गरज आहे’, असे परखड मत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडले आहे.

सुशीलकुमार शिंदेंनी आत्मचरित्रात नेमके काय म्हटले?

माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर आहे. त्यामुळे 1983 ला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला हजर राहिलो. सावरकरांना पाठिंबा दिलेल्या मुद्द्यांवर मी ठाम राहिलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांनी मोठे प्रयत्न केले. मी स्वत: मागासवर्गातील असल्याने सावरकरांच्या प्रयत्नांचे मला विशेष महत्त्वं वाटते. सावरकरांचा मुद्दा निघाला की त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का दिला जातो, याचं मला आश्चर्य वाटतं. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. सावरकरांमधला तत्वज्ञ आणि विज्ञानवादी आपण पाहू शकत नाही का?, वास्तविक सामाजिक, समता आणि दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेवून सावरकर उभे राहिले. प्रदीर्घ काळ राजकारणात काम केल्यानंतर मला वाटतं की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. (SushilKumar Shinde)

काँग्रेसची कोंडी होणार?

सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांचे ‘फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स’ अशा नावाचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे आत्मचरित्र सध्या काँग्रेसमध्ये चांगलेच चर्चेला आले आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसची वाटचाल कशी असली पाहिजे, याबाबतचे परखड मत यात मांडले आहे. त्यामध्ये वीर सावरकरांविषयी पक्षाने काय भूमिका घेणे अपेक्षित आहे, याचे डोस शिंदे यांनी या आत्मचरित्रात पक्षाला पाजले आहेत. त्यामुळे साहजिकच सत्ता मिळवायची असेल तर निवडणुकांच्या तोंडावर वीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करायचे आणि चर्चेत रहायचे, असा केविलवाणा प्रयत्न करणारे राहुल गांधी यांना सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांचे हे आत्मचरित्र म्हणजे सणसणीत चपराक आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.