सुषमा अंधारेंवर प्रत्येक जिल्ह्यात दाखल होणार गुन्हा

149

सवंग लोकप्रसिद्धीसाठी हिंदू धर्म ग्रंथ, साधू-संत आणि देवीदेवतांवर अश्लील टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा वारू आता शांत होणार आहे. कारण त्यांच्या विरोधात आता वारकरी संप्रदायाने दंड थोपटले आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांची विटंबना केल्यामुळे संतापलेल्या वारकरी संप्रदायाने सुषमा अंधारे याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली, त्यावर लागलीच अंधारे यांनी दोन हात जोडत माफी मागण्याची तयारी दाखवली. मात्र वारकरी बांधवांचा संताप शांत झाला नाही, ते राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. ३६ जिल्ह्यांत २७० तालुक्यात शाखा असलेल्या विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

अंधारेंच्या विरोधात जनक्षोभ 

सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णा विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महानुभाव संप्रदायात देखील संतापाची लाट असून अंधारे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ भगवान श्रीकृष्णासमोर घेण्याची मोहीम गावोगावी राबवली जाणार आहे. याची सुरुवात औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमातून झाली आहे. वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्ये केली तर त्याची किंमत त्यांना भोगावी लागेल असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला आहे. वारकरी संत आणि थोर महापुरुषांच्याबाबत वारंवार अपमानजनक वक्तव्ये येत असताना राज्य शासनाने याच्या विरोधात कडक कायदा करण्याची मागणी वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे ज्ञानेश्वर जळगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर आता महिला कीर्तनकार देखील आक्रमक भूमिका घेऊ लागल्या असून हिंदू देवदेवता आणि वारकरी संतांच्या अपमाना नंतर शांत कसे राहायचे असा सवाल महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांनी घेतली आहे.

(हेही वाचा आता FIFA Jihad : मुस्लिम देश मोरोक्काची फुटबॉल टीम हरल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून दंगल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.