‘त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आमच्यात दुरावा आला’, अंधारेंच्या विभक्त पतीचा खुलासा

187

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अंधारे यांना शह देण्यासाठी वाघमारे यांची राजकारणात एंट्री झाल्याचे बोलले जात आहे. पण आपल्या नवरा-बायकोच्या नात्याला तडा जाण्यामागचा धक्कादायक खुलासा वैजनाथ वाघमारे यांनी केला आहे. अंधारे राष्ट्रवादीत गेल्यानंतर आमच्या नात्यात दुरुवा आल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे.

…म्हणून आमच्या नात्यात दुरुवा आला

गेल्या 5 वर्षांपासून मी आणि सुषमा अंधारे वेगळे राहत आहोत. आमच्यात काही मतभेद झाले आहेत. अंधारे यांच्याशी माझा सामाजिक किंवा राजकीय विषयांवर कुठलाही संवाद होत नाही. पण अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. भाडोत्री वाहन म्हणून त्या राष्ट्रवादीत गेल्या आणि तेव्हापासून आमच्या मतभेद व्हायला सुरुवात झाली, असेही वैजनाथ वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात येणार, अंधारे यांच्यावर केली जोरदार टीका)

त्यांना घडवणारा मीच

सुषमा अंधारे या मुलुखमैदानी तोफ नसून त्यांना मीच घडवलं आहे, त्यांना वैचारिकरित्या परिपक्व बनवणारा मीच आहे, असे वक्तव्य वैजनाथ वाघमारे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखं नेतृ्त्व आज महाराष्ट्राला लाभलं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन मी त्यांच्या शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही वाघमारे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.