एकीकडे आदित्य ठाकरेंकडील पर्यावरण विभाग आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाशी संबंधित कामांचे ऑडिट केले जात असतानाच, आता शिवसेना-भाजप सरकारने पर्यटन मंत्रालयाशी संबंधित ५९६.१० कोटींच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : अकरावीची संपूर्ण प्रवेशप्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर…)
कामांना स्थगिती दिल्याने धक्का
पर्यावरण विभाग आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाने गेल्या अडीच वर्षांत मंजुरी दिलेल्या कामांचे ऑडिट करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयांत ही कार्यवाही केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्धवसेनेत चलबिचलता वाढली असतानाच, आता पर्यटन मंत्रालयाशी संबंधित कामांना स्थगिती दिल्याने त्यांना आणखी एक धक्का बसला आहे.
राज्यपालांच्या आदेशानुसार परिपत्र
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत २०२२-२३ मध्ये जिल्हास्तरावरील ३८१.३० कोटी रुपये, तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संबंधित २१४.८० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यास स्थगिती देण्यात येत आहे. पुढील आदेशापर्यंत त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली जाऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या आदेशानुसार हे परिपत्र काढण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community