Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन!

109
Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन!
Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची घटना घडली होती. मंत्रालयात सुरक्षाव्यवस्था असतानाही महिला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयापर्यंत पोहचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सदर प्रकरणानंतर पोलिसांची चौकशी करण्यात आली आहे. मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे.

(हेही वाचा-गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय दंगली घडवण्याचं कारस्थान; Sanjay Raut अग्रलेखातून बरळले)

प्राथमिक चौकशीत सचिव प्रवेशद्वारावर तिला अडवण्यात आले नाही अथवा तिची चौकशी करण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर तैनात पोलीस हवालदार अनिल धनंजय आवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त व बेजबाबदारीचा ठपका ठेवून पोलीस हवालदार अनिल धनंजय आवळे (Anil Dhananjay Awle) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस म्हणाले…
सदर महिलेचे काय म्हणणं होते तिने कशा करता हे केले ते आम्ही निश्चितपणे समजून घेऊ. एखाद्या उद्विग्नतेने तीने हे केले आहे का? तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ आणि ती व्यथा दूर करण्यास आम्ही प्रयत्न करू. महिलेला कुणी पाठवले याची माहिती घेणार आहे, असे त्यांनी म्हटले. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.