आत्मदहन करू द्या नाहीतर…रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक, पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

163

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी शनिवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी रविकांत तुपकर पोलिसांच्या वेशात आले आणि त्यांना अंगावर पेट्रोल ओतले. दरम्यान यावेळी तुपकर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पहायला मिळाले.

( हेही वाचा : शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर जाणार)

रविकांत तुपकर आक्रमक 

कापूस, सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले असून त्यांना पोलिसांच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतले. गेल्या ४ दिवसांपासून तुपकर भूमिगत असल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रकरणी १० फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला होता. या अल्टिमेटम संपला होता म्हणून तुपकरांना आत्मदहनाचा प्रयत्न केला.

आमचं जगण मान्य करा नाहीतर आम्हाला मारून टाका

शनिवारी सकाळपासून हजारो शेतकरी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले आहेत. एकतर आत्मदहन करू द्या नाहीतर पोलिसांच्या बंदुकांच्या गोळ्यांना आम्हाला हुतात्मा करा. आमचं जगण मान्य करा नाहीतर आम्हाला मारून टाका अशी भूमिका असल्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.