- विशेष प्रतिनिधी,मुंबई
लोकसभा निवडणुकीत राज्यातील शिंदे -फडणवीस- पवार यांच्या महायुतीतील पक्षाला कमी जागा मिळण्याबाबत आता पक्ष स्तरावर पराभवाचं विश्लेषण करण्यात येत आहे. अनेक मतदारसंघात महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला कमी झालेलं मतदान तसेच पत्करावा लागलेला पराभव याबाबतची विश्लेषण करताना अनेक बाबी समोर येत आहेत. त्यापैकी मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील नियुक्त स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (Swachh Mumbai prabodhan abhiyan) हे बंद करून त्या ऐवजी प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी एक स्वतंत्र खासगी संस्था नियुक्त करून त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता राबवण्यासाठी चाललेली प्रक्रिया, हे सुद्धा एक कारण असल्याचे बोलले जात आहे. या नव्या प्रक्रियेमध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित संस्थांची दुकाने बंद होणार असून खाजगी कंत्राटदाराला काम देण्यात येत असल्याने विविध संस्था आणि कर्मचाऱ्यांमधून महायुती सरकार मधील पक्षा बाबत नकारात्मक माहिती जनतेपर्यंत पोहोचली गेली आणि त्यामुळेच याचा काहीसा परिणाम मतदानावर झाल्याचे बोलले जात आहे. (Swachh Mumbai prabodhan abhiyan)
मुंबईतील झोपडपट्टी परिसरात स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (Swachh Mumbai prabodhan abhiyan) अंतर्गत स्वच्छता राखण्यासाठी तसेच घरोघरी जावून कचरा गोळा केला जात असला तरी ही योजना आता बंद करण्यात येणार असून यापुढे विभाग निहाय कचरा उचलण्यासह विविध प्रकारची स्वच्छता आणि शौचालयांची स्वच्छता करण्यासाठी एकाच कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (Swachh Mumbai prabodhan abhiyan) अंतर्गत करण्यात येणारी स्वच्छतेची कामे योग्य प्रकारे होत नसल्याची बाब समोर आल्याने ही मोहिम गुंडाळून एकाच संस्थेवर सर्व प्रकारच्या स्वच्छतेची कामे सोपवली जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने निविदा मागवल्या गेल्या आहेत.
(हेही वाचा- Monsoon Session 2024: मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळणार? राज्य सरकार अधिवेशनात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत)
झोपडपट्टी विभागात स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (Swachh Mumbai prabodhan abhiyan) अंतर्गत प्रती १५० एककासाठी लोकसहभागादुवारे ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतो. तसेच घरोघरी जावून कचरा गोळा करून स्वच्छता राखली जाते. सध्या या मोहिमेंतर्गत असलेल्या ४० हजार सफाई कामगारांकडून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न होत आहे. यापूर्वीच्या दत्तक वस्ती योजनेचे नाव बदलून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या (Swachh Mumbai prabodhan abhiyan) नावाखाली झोपडपट्टी भागात स्वच्छता राखण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात झोपडपट्टयांमधील स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन समाधानी नाही. सध्या झोपडपट्टी परिसरातील अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता एकाच संस्थेकडे स्वच्छता राखण्यासह कचरा उचलून नेणे आणि विभागातील शौचालयाच्या सफाईचे काम सोपवण्याचा विचार कंत्राटदार नियुक्त केला जात असल्याने हे काम करणाऱ्या संस्था आणि त्यांच्याशी निगडित कामगार वर्ग हा नाराज असून हे कर्मचारी थेट जनतेच्या अर्थात मतदारांच्या संपर्कात असल्याने त्यांची नाराजी त्यांनी जनतेपर्यंत पोहोचली. आणि यातून सरकार मधील पक्षाबाबत जनतेच्या मनात आणखी एक गैरसमज पसरवला गेला.
आपल्या मर्जीतील धनाढ्य संस्था/कंपन्यांना काम देण्यासाठी छोट्या छोट्या महिला संस्था त बेरोजगार संस्था यांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या निगडित कामगार यांना बेरोजगार केले जाईल असा समज लोकांमध्ये पसरवला गेल्याने एक प्रकारे लोकांमधील आधीच विरोधकांकडून केले जाणारे आरोप आणि त्यात अशा संस्था आणि त्यांच्या कामगारांकडून सांगितले गेल्याने लोकांमधील सरकार प्रती असलेला गैरसमज वाढला आणि त्याचा परिणाम मतदानावर झाल्याचे ऐकायला मिळत आहे. (Swachh Mumbai prabodhan abhiyan)
झोपडपट्टी, गलिच्छ वस्तीत घरोघरी पोहोचल्या जाणाऱ्या संस्था आणि त्यांचे कामगार हे विरोधकांच्या उमेदवाराचा निवडून आणण्यात यशस्वी ठरले तर सत्ताधारी पक्षांच्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवण्यात यशस्वी ठरले अशी प्रतिक्रियाही आता ऐकायला मिळत आहे. जेव्हा एखाद्या धन दांडग्याच्या बाजूने घेतला जाणारा निर्णय गोरगरीब आणि तळागाळातील लोकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न करतात त्याचा परिणाम काय होतो हे लोकसभा निवडणुकीत दिसून आला असून आगामी विधानसभा आणि पुढे होणाऱ्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत याचे. परिणाम गंभीर भोगावे लागतील असे बोलले जात आहे. (Swachh Mumbai prabodhan abhiyan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community