न्यूयॉर्कमधील मेलविले येथील BAPS स्वामीनारायण मंदिराची (Swaminarayan Temple) तोडफोड करण्यात आली. मंदिराबाहेर पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या. त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने याबाबत आक्षेप नोंदवला आहे. वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, आम्ही हा मुद्दा अमेरिकन कायद्याच्या अंमलबजावणीकडे मांडला आहे आणि हा गुन्हा करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भारतीय वाणिज्य दूतावासाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “न्यूयॉर्कच्या मेलविले येथे असलेल्या BAPS स्वामीनारायण मंदिरातील (Swaminarayan Temple) तोडफोडीची घटना स्वीकारता येणार नाही.”
(हेही वाचा Bangladesh मध्ये हिंदू असुरक्षितच; ऑगस्ट महिन्यात 15 दिवसांत हिंदूंवर हजाराहून अधिक ठिकाणांवर हल्ले)
मोदींचा 22 सप्टेंबरला दौरा
मेलविले सफोक काउंटी, लाँग आयलंडमध्ये आहे. हे 16,000-आसन असलेल्या Nassau Veterans Memorial Coliseum पासून अंदाजे 28 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी 22 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मोठ्या सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक सुहाग शुक्ला यांनी सांगितले की, हिंदू आणि भारतीय संस्थांना अलीकडच्या काळात ज्या धमक्या आहेत त्याच संदर्भात या हल्ल्याकडे पाहिले पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Swaminarayan Temple)
जानेवारी महिन्यात कॅलिफोर्नियातील मंदिरावर हल्ला
या वर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. कॅलिफोर्नियातील हेवर्ड येथील विजय शेरावली मंदिरात खलिस्तानी समर्थकांनी भारतविरोधी गोष्टी लिहिल्या होत्या. खलिस्तानींनी मंदिराच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्दही लिहिले होते.
Join Our WhatsApp Community