‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे टायटल अमोल कोल्हे यांनी केवळ फायद्यासाठी वापरलं: विश्वास पाटील

112

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर अजित पवार यांची बाजू उचलून धरत संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख कुठे आढळत नसल्याचे म्हटले होते. आता प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी कोल्हे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी केवळ आपल्या मालिकेच्या फायद्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी या नावाचा वापर केला असल्याचे म्हटले आहे. कागदपत्रानुसार, शंभुराजांना धर्मवीर या नावाने ओळखले जात होते, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबूक पोस्ट करत पुरावे दिले आहेत.

राजकारण्यांनी सुशिक्षित व्हायची वेळ आलीय

पोस्ट करत विश्वास यांनी लिहिले आहे की, संभाजीराजांना धर्मवीर म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे. कागदपत्रे साक्ष देतात. स्वराज्यरक्षक संभाजी हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरियलसाठी वापरले इतकेच, अस्सल कागदपत्रे सांगतात की, गेली 105 वर्षे महाराष्ट्र शंभूराजांना धर्मवीर या लाडक्या नावाने ओळखतो आहे. स्वत: संभाजीराजांनी हिंदू धर्मातील अनेक वाईट चालीरीतींचा धिक्कार केला होता. परंतु त्यांनी हिंदू धर्म कधीही सोडला नव्हता, हे त्यांनी हिंदू धर्म कधीही सोडला नव्हता, हे त्यांनी स्वत: कोकणातल्या बाकरे शास्त्रांना त्यांच्या हयातीतच स्वत: दानपत्र लिहून दिले आहे. आज- काल विशेषत: राजकारण्यांनी सुशिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते, असे पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ग. दि. माडगूळकरांच्या पोवाड्यात ‘धर्मभास्कर’ असा उल्लेख

ग.दि. माडगूळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजीराजांचा उल्लेख एकदा ‘धर्मभास्कर’ असा केला होता. अन्यथा स्वराज्यरक्षक हा किताब शंभूराजांना आपल्या सिरियलच्या उच्चांकासाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार अमोल कोल्हे यांनी वापरला आहे. त्या शब्दाचा त्याधी इतिहासात कुठेही उल्लेख नाही. पाटील यांच्या या पोस्टवर अनेक नेटक-यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.