Swati Maliwal : केजरीवालांच्या बंगल्यात स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन झाले, AAP ची कबुली

245
AAP : स्वाती मालीवाल प्रकरणात पोलीस सक्रिय

ऱआम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे मान्य केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Pune Unauthorized Hoardings : नियमांची पायमल्ली करून शहरात तब्बल २ हजार ५०० अनधिकृत होर्डिंग)

काय म्हणाले संजय सिंह ?

खासदार संजय सिंह (Sanjay Singh) म्हणाले की, काल एक निंदनीय घटना घडली आहे. स्वाती मालीवाल या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. तेथील ड्रॉईंग रुममध्ये त्या अरविंद केजरीवाल यांची वाट पाहत असताना तिथे आलेल्या विभव कुमार यांनी त्यांच्यासोबत कथितपणे गैरवर्तन केले. या प्रकरणाची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर दखल घेतली असून, ते आता या प्रकरणी योग्य ती कारवाई करतील. स्वाती मालीवाल यांनी देश आणि समाजासाठी खूप काम केलं आहे. त्या आम आदमी पक्षाच्या जुन्या आणि वरिष्ठ नेत्या आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

या मुद्द्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Swati Maliwal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.