आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यावर सीएम हाऊसमध्ये झालेल्या हल्ल्या प्रकरणाचा विशेष तपास पथक (SIT) करणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीचे नेतृत्व उत्तर दिल्लीच्या डीसीपी अंजिता चेप्याला करत आहेत. या पथकात निरीक्षक दर्जाच्या ३ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ज्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तपास केल्यानंतर एसआयटी आपला अहवाल वरिष्ठांना सादर करेल. (Swati Maliwal Case)
१३ मे रोजी घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी २० मे रोजी विभव कुमारला सीएम हाऊसमध्ये नेले होते. सुमारे दीड तास पोलिस घटनास्थळी थांबले होते. सायंकाळी ५.४५ वाजता पोलिस विभवला सीएम हाऊसमध्ये पोहोचले आणि ७.२६ वाजता बाहेर आले. विभव कुमार सध्या २३ मे पर्यंत दिल्ली पोलिस कोठडीत आहे. १८ मे रोजी दिल्ली पोलिसांनी विभवला ७ दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र त्याला फक्त ५ दिवसांची कोठडी दिली होती. विभववर १३ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती (Swati Maliwal) यांच्याशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. (Swati Maliwal Case)
(हेही वाचा – Hunt For New Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी आता बीसीसीआयच्या रडारवर स्टिफन फ्लेमिंग)
स्वाती-विभव यांच्यासोबत सीन रिक्रिएशननंतर पोलिस करणार विश्लेषण
आरोपी विभव आणि पीडित स्वाती या दोघांसोबत सीन रिक्रिएशन करण्यात आले आहे. दिल्ली पोलिस या दोघांकडून घटनेबाबत मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करत आहेत. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी टिपून घेतली आहेत. त्यांचे मॅपिंगही करण्यात आले असून, ज्या ठिकाणी स्वाती यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्या ठिकाणचे छायाचित्रणही करण्यात आले आहे. दिल्ली पोलिस विभव कुमारच्या घरीही गेले. (Swati Maliwal Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community